Sunday, 9 October 2016

सरल महत्वाचे

सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : 1008
दिनांक : 01 / 01 / 2017
(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे

(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

______________
शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल मध्ये 31 डिसेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल (Closing Balance) दिनांक 08/01/2017 पर्यंत नोंद करण्याबाबतच्या सूचना ______________

   सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, मागील महिन्यात दिलेल्या सूचनेनुसार सर्व शाळांना ३० नोव्हेंबर २०१६ चा प्रत्यक्ष शिल्लक धान्य साठा म्हणजेच क्लोजिंग बँलन्स MDM पोर्टल ला भरावयाचा होता.परंतू दिलेल्या सूचनेनुसार अद्याप बऱ्याच शाळांनी सदर माहिती भरून पूर्ण केलेली नाही व ज्या शाळांनी माहिती भरलेली आहे त्यापैकी बऱ्याच शाळांची माहिती चुकलेली आहे, असे दिसून आलेले आहे.म्हणून ही चुकलेली माहिती पुन्हा भरता यावी व माहिती न भरलेल्या  शाळांना माहिती भरता यावी यासाठी Closing Balance भरण्याच्या सुविधेमध्ये मुदतवाढ देऊन सर्व शाळांना नव्याने पुढील सुचना देण्यात येत आहे,त्यानुसार कार्यवाही करावी.

➡ ज्या शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ च्या क्लोजिंग बँलन्सची माहिती MDM पोर्टल ला भरलेली नाही अशा शाळांसाठी सुचना :

   वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत ३० नोव्हेंबर २०१६ च्या क्लोजिंग बँलन्सची माहिती MDM पोर्टल ला भरावयाची होती.परंतु अद्याप बऱ्याच शाळांनी ही माहिती भरलेली नाही.अशा शाळांनी यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ ची क्लोजिंग बँलन्स ची माहिती न भरता ३१ डिसेंबर २०१६ या दिवशीच्या क्लोजिंग बँलन्स ची माहिती भरावी.ही माहिती भरण्यासाठी अंतीम मुदत ही ८ जानेवारी २०१७ देण्यात आलेली आहे.

➡ ज्या शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ च्या क्लोजिंग बँलन्सची माहिती MDM पोर्टल ला भरलेली आहे अशा शाळांसाठी सुचना :

ज्या शाळांनी या आधीच ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स MDM पोर्टल मध्ये नोंद केलेला आहे,अशा शाळांनी देखील ३१ डिसेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स MDM पोर्टल ला नोंद करावयाचा आहे.तशी सुविधा नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरलेल्या शाळांना डिसेंबर चा क्लोजिंग बँलन्स  भरण्यासाठी पुन्हा देण्यात आलेली आहे.परंतु अशा  शाळांनी आधीच ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरलेला असल्याने या शाळांना डिसेंबर महिन्याचा क्लोजिंग बँलन्स हा आपल्या नोंद वही प्रमाणे असल्याचे त्या स्क्रीन वर दिसून येईल,तो बॅलन्स तपासून आवश्यकता वाटल्यास दूरस्थ करावा आणि approval द्यावे .जर नोव्हेंबर चा क्लोजिंग बँलन्स भरताना काही चुका झालेल्या असतील अथवा संपूर्ण डिसेंबर महिन्याच्या daily attendance ची माहिती भरताना काही चुका झालेल्या असतील तरच आपल्या स्क्रीन वर दिसत असलेला डिसेंबर महिन्याचा क्लोजिंग बँलन्स  हा नोंद वही प्रमाणे जुळत नसल्याचे दिसून येईल.असे दिसून आले असले तरी सदर क्लोजिंग बँलन्स हा ज्याप्रमाणे ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स  approve केलेला होता त्याप्रमाणे आपणास पुन्हा एकदा ३१ डिसेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स नोंद वही प्रमाणे आहे किंवा नाही हे तपासून घेऊन आवश्यक वाटल्यास त्यात दुरुस्थी करून approve करावयाचा आहे.३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरताना जर काही चुका झालेल्या असतील तर त्याबाबत अधिक काळजी करण्याची गरज नाही आहे हे लक्षात घ्यावे.कारण डिसेंबर महिन्याचा क्लोजिंग बँलन्स भरताना आपण आता ही चूक दुरुस्थ करू शकणार आहात.वरिष्ठ कार्यालयाकडून घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार आता नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्याचा क्लोजिंग बँलन्स हा पुढील कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यामुळे ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरताना आपली चूक झालेली असेल तरी त्याविषयी काळजी न करता आता नव्याने आपल्या नोंद वही प्रमाणे ३१ डिसेंबर चा क्लोजिंग बँलन्स  भरून घ्यावा.मात्र त्या वेळी सदर माहिती ही काळजीपूर्वक भरावी.कारण यानंतर झालेली चूक दुरुस्थ करण्याची संधी आपणास दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

    म्हणजेच वरील दोन्ही सूचनेनुसार आता सर्व शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ ची क्लोजिंग बँलन्स  ची माहिती न भरता ३१ डिसेंबर २०१६ च्या क्लोजिंग बँलन्स ची माहिती MDM पोर्टल ला भरावयाची आहे.

______________
     इतर काही महत्वाच्या सूचना :  ______________

✏ डिसेंबर महिन्याचा Closing Balance भरल्यानंतर जेंव्हा आपल्या शाळेत धान्य पुरवठा होईल तेंव्हा त्वरित त्या धान्याची नोंद stock inward ला घ्यावी आणि finalized करावे.त्यानंतच आपली नोंद वही आणि online माहिती जुळलेली दिसेल.

✏ मिरची पावडर,गरम मसाला,कांदा लसूण मसाला या धान्यादी मसाल्याच्या पदार्थाची नोंद घेताना त्या त्या नावासमोरच त्या त्या पदार्थाची नोंद घ्यावी.इतर नावासमोर नोंद घेऊ नये.

✏ जेंव्हा आपण Closing Balance भरण्यास सुरुवात करतो तेंव्हा त्या त्या स्क्रीन मध्ये आधीच दिसून येत असलेली सर्व आकडेवारी ही काढून टाकावी म्हणजेच 0 करावी.बऱ्याचदा असे न केल्याने काही पदार्थ शाळेत सध्या नसताना त्यात आकडेवारी भरलेली असलेली माहिती approve होण्याची शक्यता आहे.

✏ वरिष्ठ स्तरावरून Online  पद्धतीने धान्य व धान्यादी मालाची मागणी करता यावी या हेतूने Closing Balance भरण्याचे काम सर्व शाळांनी प्राधान्याने करावयाचे आहे.



______________
MDM पोर्टल ला क्लोजिंग बँलन्स कसा भरावा याविषयी सुचना  ______________

✏ सर्वप्रथम मुख्याध्यापकाने education.maharashtra.gov.in या website वर जाऊन आपले MDM पोर्टल ला संगणकावर (mobile वर नव्हे ) शाळा login करावे.
     
                               ⬇                      

✏ MDM पोर्टल मध्ये login मध्ये दिसून येत असलेल्या MDM Daily Attendance या tab ला क्लिक करावे.
 
                               ⬇


✏ MDM Daily Attendance या tab ला क्लिक करून आपण दररोजच्या उपस्थितीत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या नोंद करण्याचे काम करत असतो.परंतु यावेळी मात्र आपणास त्या संदर्भातील नेहमीचे page न दिसता तेथे कॅलेंडर असलेली एक नवीन स्क्रीन दिसून येईल.

  ही स्क्रीन डिसेंबर २०१६ या महिन्याच्या कॅलेंडर ची स्क्रीन आहे.या स्क्रीन मध्ये आपणास इतर कोठेही क्लिक न करता फक्त खालच्या बाजूला असलेल्या Approve Closing Balance या बटनावर क्लिक करावयाचे आहे हे लक्षात घ्या.त्यानंतर आपणास  डिसेंबर २०१६ या महिन्याची  Closing Balance ची एक स्क्रीन open झालेली दिसेल.

   डिसेंबर २०१६ या महिन्याच्या  Closing Balance स्क्रीन मध्ये आपणास   Closing Balance (1 To 5) आणि Closing Balance (6 To 8 ) अशा दोन वेगवेगळ्या कॉलम मध्ये माहिती स्क्रीन वर दिसेल.स्क्रीन वर दिसत असलेला Closing Balance आणि आपल्या नोंद वहीत असलेला प्रत्यक्ष Closing Balance हा सारखा असणे आवश्यक आहे.याकारीती MDM पोर्टल मध्ये आपणास दिसत असलेल्या वरील स्क्रीन मधील Closing Balance यात दुरुस्थी होणे गरजेचे आहे.ही दुरुस्थी करण्यासाठी नोंद वहीत असलेली प्रत्यक्ष माहिती खात्री करून  वरील फॉर्म मध्ये आपणास update/दुरुस्थ करावयाची आहे.म्हणजेच आपल्या नोंद वहीत असलेला दिनांक  ३१ डिसेंबर  २०१६ रोजीचा Closing Balance आणि MDM पोर्टल ला असलेला दिनांक  ३१ डिसेंबर  २०१६ रोजीचा Closing Balance हा एकसारखा येईल अशी दूरूस्थी करावयाची आहे.हे करत असताना आपल्या नोंद वही मधील दिनांक  ३१ डिसेंबर २०१६ रोजीचा Closing Balance हा अंतिम समजण्यात यावा आणि त्या दृष्टीने MDM पोर्टल मधील दिनांक  ३१ डिसेंबर  २०१६ रोजीचा Closing Balance मध्ये योग्य तो बदल करावा. सदर माहिती ही दिनांक 3 जानेवारी ३ जानेवारी २०१७ ते दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजीपर्यंत आपणास भरता येईल.सर्व माहिती भरून झाल्यावर स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे approve या tab ला क्लिक करावे.

    अशा रितीने सर्व शाळांनी आपला ३१ डिसेंबर  २०१६  या दिवशीचा Closing Balance हा update करून घ्यावा. एकदा Closing Balance भरून/update केल्यावर पुन्हा त्यामध्ये दुरुस्थीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.त्यामुळे माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी आणि त्यानंतरच Approve या बटनावर क्लिक करावे.

    अशा प्रकारे Closing Balance भरणे ही प्रक्रिया फक्त याच महिन्यासाठी करावयाची आहे.यापुढे प्रत्येक जिल्ह्याच्या दर विद्यार्थ्यामागे धान्य आणि धान्यादी मालाचे वापरावयाचे प्रमाण हे निश्चित करण्यात आलेले आहे.म्हणजेच एकदा आपण डिसेंबर महिन्याचा Closing Balance  हा MDM पोर्टल ला भरला की त्यानंतर आपल्या शाळेचा चालू दिवशीचा Closing Balance  हा अचूकपणे पाहता येईल.यासाठी Stock Balance Report या tab ला क्लिक करावे.यानंतर Closing Balance आणी Current balance या बटनाला क्लिक करून आपण आपल्या शाळेतील प्रत्यक्ष धान्य साठ्याची स्थिती online पाहू शकतो.

   अशा प्रकारे सर्व शाळांनी  डिसेंबर  २०१६   या महिन्याचा Closing Balance नोंद करण्याची ही प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण करावयाची आहे. दिनांक ०८/०१/२०१७  नंतर ही सुविधा कोणत्याही शाळेसाठी उपलब्ध नसेल.म्हणजेच दिनांक  ०८/०१/२०१७  ही माहिती भरण्याची/update करण्याची अंतीम मुदत आहे हे लक्षात घ्यावे.अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपणास अधिक सविस्तर माहिती मिळेल.

ही माहिती MDM पोर्टल मध्ये कशी भरायची याबाबत चे चित्रयुक्त मॅन्युअल आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,ते वाचण्यासाठी/Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.

➡ मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठीची लिंक :

https://goo.gl/vQwXoq

______________
ज्या शाळांनी इतर शाळांना धान्य वा धान्यादी माल उसने दिले असेल तर अशा शाळांसाठी सुचना  ______________

✏ज्या शाळांनी इतर शाळांना धान्य वा धान्यादी माल उसना दिला असेल अशा शाळांनी उसना दिलेला माल आपल्या धाण्यासाठ्यातून वजा करून घेऊन त्यानंतरच मग क्लोजिंग बँलन्स हा MDM पोर्टल ला नोंदवावा.
______________
 ज्या शाळांनी इतर शाळांकडून धान्य वा धान्यादी माल उसना घेतला असेल तर अशा शाळांसाठी सुचना  ______________

✏ज्या शाळांनी इतर शाळांकडून धान्य वा धान्यादी माल उसना घेतला असेल अशा शाळांनी उसने घेतलेल्या मालाची नोंद आपल्या क्लोजिंग बँलन्स मध्ये घ्यायची आहे.उसना घेतलेल्या मालाची नोंद ही कोणत्याही परिस्थितीत मायनस म्हणजेच वजा करावयाची नाही याची नोंद घ्यावी.
______________
ज्या शाळांनी इतर शाळेकडून माल उसना न घेता इतर कोणाकडून उसना घेतलेला असेल (उदा., बचत गट )  अशा शाळांसाठी सुचना  ______________

✏ज्या शाळांनी इतर शाळेकडून माल उसना न घेता इतर कोणाकडून उसना घेतलेला असेल अशा केस मध्ये त्यांच्याकडून घेतलेले साहित्य हे  क्लोजिंग बँलन्स मध्ये दाखवणे गरजेचे आहे.हा माल कोणत्याही परिस्थितीत मायनस दाखवू नये.इतर कोणाकडून उसना घेतलेला माल हा साठ्यातून कमी करण्यासाठीची सुविधा म्हणजेच stock outward ची सुविधा देण्यात येणार आहे.त्या वेळी सदर माल हा धान्य साठ्यातून वजा करता येईल.
______________
दिनांक १ डिसेंबर २०१६ या दिवशी पासून ते दिनांक २ डिसेंबर २०१६ पर्यंत या कालावधीमध्ये जर शाळांनी सुचना न मिळाल्यामुळे नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरून approve केला असेल तर अशा शाळांना डिसेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरता येत नाही या समस्येविषयी सुचना  ______________

✏MDM पोर्टल मध्ये शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत भरावा अशा सुचना दिल्या गेल्या होत्या.परंतु काही शाळांनी माहिती भरताना खूप उशीर केला.त्यानंतर क्लोजिंग बँलन्स भरण्याची सुविधा ही डिसेंबर २०१६ साठी सुरु ठेवायची असल्याने चालूच होती.परंतु दिलेल्या सुचना न समजल्याने काही शाळांनी १ जानेवारी नंतर देखील ३० नोव्हेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरला व approve केला.खरं तर त्यामध्ये ३१ डिसेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरने अपेक्षित होते.आता मात्र सदर क्लोजिंग बँलन्स approve केल्याने अशा शाळांना डिसेंबर २०१६ चा क्लोजिंग बँलन्स भरण्यासाठी सदर स्क्रीन उपलब्ध होत नसल्याची समस्या येत आहे.अशा शाळांनी गोंधळून जाऊ नये.कारण ज्या शाळांनी अशा चुका केलेल्या आहेत अशा शाळांना (फक्त १ व २ जानेवारी २०१६ या दिवशी माहिती भरताना अशी चूक झालेली असेल अशा शाळांना) ही माहिती दुरुस्थ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अशा शाळांनी पुढील सूचनेची वात पहावी.

_______________
                     धान्य उसने घेताना  ______________

✏ज्या वेळी आपल्या शाळेतील धान्य संपते तेंव्हा सर्वप्रथम आपल्याच शाळेतील १ ते ५ वर्गाने ६ ते ८ कडे आणि ६ ते ८ वर्गाने १ ते ५ वर्गाकडे धान्य उपलब्ध असल्यास उसने घ्यावे. हे धान्य उसने घेताना तशी नोंद आपल्या नोंद वही मध्ये आणी MDM पोर्टल च्या stock inward या form मध्ये करावी.

✏जर आपल्या शाळेतील कोणत्याही वर्गाकडे धान्य उपलब्ध नसेल तर आपल्या शेजारच्या शाळेकडून धान्य उसने घ्यावे.हे धान्य उसने घेताना तशी नोंद आपल्या नोंद वही मध्ये आणी MDM पोर्टल च्या stock inward या form मध्ये त्या शाळेचा udise नंबर भरून करावी.

✏जर शेजारच्या शाळेकडे देखील धान्य उपलब्ध नसेल अशा वेळी खुल्या बाजारातून धान्य वा धान्यादी माल विकत घ्यावा.परंतु सदर माल विकत घेण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे.त्यानंतर आपण खुल्या बाजारातून सदर माल विकत घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे बील सादर करू शकता.वरिष्ठ कार्यालाकडून परवानगी न मिळवता माल खुल्या बाजारातून विकत घेता येणार नाही हे लक्षात घ्यावे.

याबाबत अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.

लिंक :  

https://goo.gl/6CiLy0

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

No comments:

Post a Comment