सरल महत्वाचे


दिनांक : 08/10/2016
(त्वरित सर्वांना पोस्ट करावी)
प्रदीप भोसले,हवेली,पुणे


        Student portal  विशेष
                       विषय 1 :

 जर आपल्या लॉगिन ला विद्यार्थी ट्रान्सफर करण्यासाठी request आलेली असेल आणि आपण request approve/reject करण्याचा प्रयत्न करूनही ती approve/reject होत नसेल याविषयी*


मित्रांनो जर आपल्या शाळेस विद्यार्थी ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सफर request आलेली आहे आणि आपण त्या request ला approve/reject करत आहात,आपणास स्क्रीन वर मेसेज पण येत आहे की "student transfe/reject successfully"  परंतु प्रत्यक्षात विद्यार्थी मात्र जात नाही आहे,आणि या समस्येमुळे आपले सर्व काम थांबले असेलच.असे जर आपल्या बाबतीत होत असेल तर  आपणास एक विनंती केली जात आहे की कृपया आपणास अशी समस्यां आम्हाला पुढील लिंक ला क्लीक करून दिलेला फॉर्म भरून online कळवावी.आपली समस्या त्वरित दूर केली जाईल याची नोंद घ्यावी.

लिंक  :   goo.gl/tLuhLA

या बाबतीत मा. डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य यांनी परवाच्या V. C मध्ये सर्व उपसंचालक,शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी दिलेल्या आहे.कृपया आपली माहिती अपूर्ण राहिल्यास आपली  संचमान्यता ही अपूर्ण माहितीवर होईल याची नोंद घ्यावी.सदर फॉर्म हा आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर देखील उपलब्ध करून दिलेला आहे.
सर्व शाळांना विनंती आहे की आपणास विद्यार्थी ट्रान्सफर साठी आलेली request आपणाकडून approve अथवा रिजेक्ट होत नसेल तर ती आम्हाला त्वरित वरील लिंक ला क्लीक करून कळवावे,तसेच ही समस्या गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शाळांच्या या समस्यां सदर लिंक ला कळवण्याकामी योग्य सूचना व मार्गदर्शन करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

                     विषय  2 :

ट्रान्सफर साठी request आलेली आहे पण त्या request मध्ये विद्यार्थ्याचे नाव दिसत नाही आणि अशा requesy approve/reject होत नाही अशा समस्येबाबत  :

असे का झाले :

आपणास एखाद्या नवीन शाळेने विद्यार्थी ट्रान्सफर request केली आहे आणि ती request न पाहता तो मुलगा आपल्या शाळेत नाही म्हणून त्याच मुलाला जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने out of school केले असेल तर त्या जुन्या शाळेच्या लॉगिनला सदर विद्यार्थ्याची request दिसून येईल परंतु त्या request मध्ये विद्यार्थ्याचे नाव दिसणार नाही आहे कारण त्या विद्यार्थ्याला आपण out of school केलेले आहे हे लक्षात घ्यावे.ही सिस्टिम ची चूक नसून अशा आपली  चूक असते.

ही समस्यां सोडवण्यासाठी उपाय :

आजपर्यंत अशी समस्यां असणाऱ्या शाळांच्या मुलांची नावे जी ट्रान्सफर request मध्ये दिसत नव्हती ती सिस्टिम द्वारे दिसतील असे बदल आज वरिष्ठ लेवल वरून करून देण्यात आलेले आहे.आजपासून अशा मुलांची नावे आलेल्या ट्रान्सफर request मध्ये दिसतील तरी त्या मुलांना approve/reject करावे.

लक्षात ठेवण्यासारखे :
अशी समस्यां पुन्हा येऊ नये म्हणून यापुढे ज्या मुलांची ट्रान्सफर साठी request आलेली आहे अशा कोणत्याही मुलाच्या request ला  आपणास approve अथवा reject केल्याशिवाय संबंधित मुलाला out of school करू दिले जाणार नाही.

तसेच आऊट ऑफ स्कूल केलेली मुले ही सध्या जरी ट्रान्सफर साठी दिसत नसली तरी  गुरुवार पासून अशी मुले ट्रान्सफर साठी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.


ट्रान्स्फर संदर्भात अपूर्ण काम पूर्ण कसे करावे याबाबतच्या माहितीपत्रक download करण्याची लिंक:
     
    https://goo.gl/eCyI7x
student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.

लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी भरावयाच्या फॉर्म ची लिंक वर क्लीक करा

 लिंक :  

https://goo.gl/6CiLy0

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

No comments:

Post a Comment